तीन कोटींहून अधिक डेबिट क्रेडिट कार्डची माहिती चोरी, माहितीची ऑनलाईन विक्री

732

जगभरातील तीन कोटींहून अधिक डेबिट आनि क्रेडिट कार्डची माहिती चोरी झाली आहे. तसेच ही माहिती आता ऑनलाईन विकलीही जात आहे. पेट्रोल भरताना, ऑनलाईन जेवण मागवताना तसेच ऑनलाईन शॉपिंग करताना ही माहिती चोरली गेली आहे.

एका अहवालानुसार 2019 मध्ये 850 दुकाने आणि 3 कोटी लोकांच्या पेमेंटची माहिती चोरली गेली आहे. मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये अशा प्रकारे कार्डचा ट्रॅक – 2 चोरीला गेले होते. या ट्रॅकमध्ये ग्राहकाची माहिती खरेदी विक्रीची माहिती असते. ज्या दुकानांची माहिती चोरली गेली आहे. त्यातील अनेक अमेरिकेच्या वित्तीय संस्थांचा समावेश  आहे. तसेच ही चोरलेली माहिती एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकली जाते.

आपली प्रतिक्रिया द्या