कोल्हापुरात पुन्हा महापुराचा धोका; धरणात 40 टक्क्यांहून जास्त पाणीसाठा

632

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारपासून धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी सर्वाधिक करवीरमध्ये 45.73 आणि सर्वात कमी शिरोळ तालुक्यात 1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अजूनही जिल्ह्यातील सर्वच धरणे 40 टक्क्यांहून अधिक भरलेलीच आहेत. यापुर्वी आलेल्या महापुरानंतरही दुसऱ्या वर्षीही पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता, यंदाही महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.

काही ठिकाणी करण्यात आलेली अवैध बांधकामे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, व्यस्त प्रशासन, आरोग्य यंत्रणा पाहता पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नाले, गटारी स्वच्छता झालेली नाही. त्याचाही परिणाम पाणी साचण्यावर होणार आहे. दरवर्षी महापुराला जबाबदार ठरविण्यात येणाऱ्या अलमट्टी धरणात कोल्हापूरच्या पंचगंगेचे आणि सांगलीकडून येणाऱ्या कृष्णेचे पाणी सोडण्याबाबत आत्तापासूनच धोरणे ठरविणे गरजेचे आहे. एप्रिल ते मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवते. यंदा मात्र अजुनही जिल्ह्यात सर्वच धरणांतील पाणीसाठा 40 टक्क्यांहून अधिक आहे. त्यात रविवारपासून पावसाने लावलेली तुफान हजेरी पाहता यावेळी ही अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय यापुर्वी महापुरानंतरही दुसऱ्या वर्षी पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे यंदाही पुन्हा महापुराचा दणका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढतच आहे.अशात महापूर आल्यास, त्यापुढे जिल्हा प्रशासन अत्यंत तोकडे पडणार आहे. गेल्यावर्षी महापुरामुळे शहरात यापूर्वी कधीही महापुराचे पाणी आले नव्हते. अशा ठिकाणीही महापुर आला होता. अवैध बांधकामे यासाठी कारणीभूत असल्याचेही नुकत्याच सादर करण्यात आलेल्या वडणेरे समितीतूनही समोर आले आले. सध्या रेडझोनमधील भराव टाकून करण्यात आलेली बांधकामे महानगरपालिकेने परवानगी नाकारल्याने,अजुन जैसे थे आहेत.तर काही बांधकामे रेटुन करण्यात आली आहेत.यांसह कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा व्यस्त राहिल्याने,पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नाले ,गटारी स्वच्छता बहुतांश सर्वच ठिकाणी अपुर्ण राहिलेल्या आहेत.त्यात रविवार दुपारनंतर जिल्ह्यात पावसाने लावलेली धुवांधार हजेरी पाहता,यंदाही जिल्ह्याला पुन्हा एकदा महापुराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात रविवारी दुपारपासून वीजेच्या प्रचंड कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासुन पुन्हा धुवांधार पाऊस झाला. पुन्हा दुपारनंतर संततधार पाऊस झाला. जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी धरणात अजूनही 42.84 दलघमी पाणीसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतरही धरणे, मध्यम व लघु प्रकल्प 40 ते 70 टक्के भरलेली आहेत. यामध्ये तुळशी 46.66, वारणा-327.25, दूधगंगा 214.39, कासारी 21.38, कडवी 30.20, कुंभी 27.14, पाटगाव 22.71,चिकोत्रा 15.42,चित्री 13.05, जंगमहट्टी 9.29, घटप्रभा14.91,जांबरे 6.31 आणि कोदे (ल.पा.) 1.38 दलघमी असा सध्या पाणीसाठा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या