राज्यात आढळले कोरोनाचे 9 हजारहून अधिक रुग्ण, एकूण रुग्ण पाच लाखांच्यावर

528

गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 9 हजार 1781 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 24 हजार 513 वर पोहोचली आहे.


तर गेल्या 24 तासात 6 हजार 711 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3 लाख 58 हजार 421 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 735 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

तर मुंबईत आज 925 रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासात 1 हजार 407 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 97 हजार 993 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या 19 हजार 190 सक्रिय रुग्ण आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या