देशभरात सध्या आयपीओची चलती आहे. अनेक कंपन्या आयपीओ आणत आहेत. देशातील 64 कंपन्यांनी आतापर्यंत 93,647 कोटी रुपये जमवले आहे. पुढील आठवड्य़ात तीन कंपन्या 5 हजार कोटी रुपयांसाठी आयपीओ आणणार आहे. डिसेंबरपर्यंत 1.20 लाख कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये 58 कंपन्यांनी 49,437 कोटी, 2022 मध्ये 40 कंपन्यांनी 59,939 कोटी आणि 2021 मध्ये 63 कंपन्यांनी 120 कोटी रुपये जमवले होते. पुढील वर्षी सुद्धा मोठ्या कंपन्या आयपीओ आणणार आहेत.