सणासुदीसाठी मध्य रेल्वेच्या 260 तर पश्चिम रेल्वेच्या 156 स्पेशल ट्रेन

दसरा आणि दीपावली सणासुदीची मागणी पाहून मध्य रेल्वेने 260 तर पश्चिम रेल्वेने 156 सणासुदीच्या स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे मुंबई ते पुरी-गोरखपूर-हुब्बाळी-हटीया-विशाखापट्टणम-रक्सोल-भुवनेश्वर आणि पुणे-संतरागाछी या दरम्यान स्पेशल ट्रेन चालविणार आहे. तर पश्चिम रेल्वे 12 जोडी स्पेशल ट्रेनच्या 156 फेऱया चालविणार असून पाच जोडय़ा वांद्रे टर्मिनस, दोन जोडय़ा प्रत्येकी इंदोर आणि उधना आणि एक जोडी प्रत्येकी ओखा, पोरबंदर आणि गांधीधाम स्टेशन येथून चालविण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते पुरी दरम्यान 12 साप्ताहिक सुपर फास्ट ट्रेन, लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर 84 दैनिक स्पेशल, मुंबई ते गोरखपूर साप्ताहिक 12 स्पेशल, लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुब्बाळी दैनिक 80 स्पेशल, एलटीटी ते हटीया 12 साप्ताहिक स्पेशल, एलटीटी ते विशाखापट्टणम 12 साप्ताहिक स्पेशल, मुंबई ते रक्सोल 12 साप्ताहिक स्पेशल ट्रेन, एलटीटी ते भुवनेश्वर 24 फेऱया आठवडय़ातून दोनदा, पुणे ते संतरागाछी 12 साप्ताहिक स्पेशल चालविण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या ट्रेनचे आरक्षण 18 आणि 20 ऑक्टोबरपासून सुरू तर पश्चिम रेल्वेच्या ट्रेनचे आरक्षण 17 आणि 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या ट्रेन संपूर्ण आरक्षित ट्रेन असणार असून या स्पेशल ट्रेन म्हणून स्पेशल फेअर आकारून चालविण्यात येणार आहेत. या ट्रेनच्या प्रवाशांना कोविड-19 संदर्भातील राज्य सरकारने जाहीर केलेले सर्व नियम पाळावे लागणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या