मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या महिलेसमोर तरुणाचे अश्लील चाळे, पोलिसात तक्रार दाखल

930

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे एका महिलेसमोर एका तरुणाने अश्लील चाळे केले करून तिचा विनयभंग केला आहे. बेंगळुरू येथील डोड्डानेकुंडी सरोवराजवळ ही घटना घडली आहे. या तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी डोड्डानेकुंडी सरोवरानजीक असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर पीडिता मॉर्निंग वॉकसाठी आली होती. तिथे आधीच एक तरुण त्याच्या कुत्र्यासह बसला होता. पीडिता तरुणाजवळ आल्याचं पाहून त्याने कुत्र्याचा पट्टा सोडला. कुत्रा शेपूट हलवत पीडितेजवळ येऊन राहिला. कुत्र्याला जवळ आलेलं पाहून पीडिता त्याचे लाड करू लागली. हे सर्व सुरू असताना कुत्र्याचा मालक तिच्याजवळ आला आणि त्याने त्याच्या पँटची चेन उघडली.

त्याने पीडितेचा हात पकडला आणि जबरदस्तीने त्याच्या गुप्तांगाला स्पर्श करण्याविषयी तिला सांगू लागला. हे पाहून पीडितेने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिचा ओरडा ऐकून त्याने घाबरून पँटची चेन बंद केली आणि तिथून निघून जाऊ लागला. पण, पीडितेने प्रसंगावधान राखून त्याची कॉलर पकडून त्याचा फोटो काढला. मात्र, आरोपी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला.

या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तिने पोलिसांना आरोपीचा फोटोही दिली आहे. तसेच फेसबुकवर पोस्ट लिहून या प्रसंगाविषयी इतरांना सावध राहावं, असं आवाहन केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या