अख्खी मशीद हलवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । तुर्की

तुर्की येथे बंधाऱ्याच्या कामाच्या आड येणारी अख्खी मशीद हलवण्यात आली आहे. 2500 टन वजनाची हसनकैफ शहरातील इयुबी मशीद 300 चाकांच्या शक्तिशाली रोबोटच्या सहाय्याने कल्चरल पार्क फिल्डमध्ये प्रस्थापित करण्यात आली. पुराच्या पाण्यात ऐतिहासिक मशिदीला हानी पोहोचू नये म्हणून तिला हलवण्यात आले, अशी माहिती हसनकैफचे महापौर अब्दुलवहाप कुसेन यांनी दिली.