दोन महिन्याच्या चिमुरडीचा मृतदेह सापडला नाल्यात, आईच निघाली खूनी

838
child

पश्चिम बंगालमध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका आईने आपल्या दोन वर्षाच्या चिमुरडीचा खून करून तिला नाल्यात फेकले आहे. पोलिसांनी आईला अटक केली आहे.

कोलकातामध्ये एका आईने आपल्या पोटच्या मुलीचा खून करून तिल्या नाल्यात फेकले. नंतर आईने आपल्या मुलीचे अपहरण झाल्याचा बनाव केला. पोलिसांनी मुलीचा शोध घेतला असता घराजवळील एका नाल्यात तिचा मृतदेह आढळला. नंतर आईनेच मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. प्रसृतीनंतर महिला खूप तणावात होती. त्यामुळेच तिने हे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आईला अटक केली असून तिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या