गुजरातमध्ये नियम मोडणार्‍या वाहनचालकांच्या दंडात मोठी कपात

535

वाहतूक नियम मोडणाऱयांना ताळ्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या दंडवसुलीचा बडगा उगारला असताना गुजरात सरकारने मात्र वाहनचालकांना दिलासा दिला आहे. हेल्मेट परिधान न करणे, सीट बेल्ट न घालणे आदी गुन्हे करणार्‍या वाहनचालकांकडून 1 हजारऐवजी 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. 16 सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

गुजरातच्या भाजप सरकारने केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या मोटर वाहन कायद्यात बदल करून वाहनचालकांना दिलासा दिला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात आता हेल्मेट परिधान न करणार्‍या तसेच सीट बेल्ट न घालणार्‍या वाहनचालकांकडून 1 हजारऐवजी 500 रुपयांचा दंड वसूल केला जाईल, असे रुपाणी यांनी स्पष्ट केले. वाहतूक नियम मोडणाऱयांकडून अवाचे सवा दंड वसूल करण्यावर रुपाणी यांनी आक्षेप घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण रुपाणी यांनी दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या