हे करून पहा – सतत तोंड येतंय का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तोंड येणे म्हणजेच तोंडात उष्णेतेचे पह्ड येणे. हे सहसा गंभीर नसतात, पण ते वारंवार येत असतील तर ते शरीरातील काहीतरी बिघाडांचे लक्षण आहे. शरीरातील पोषक तत्त्वांचा अभाव आणि पचनसंस्थेतील बिघाड या दोन्ही गोष्टी यासाठी कारणीभूत असू शकतात.

यावर उपाय म्हणून कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास जंतू मरतात आणि जखम लवकर भरते. पह्डावर मध किंवा शुद्ध तूप लावल्याने जळजळ, सूज व वेदना कमी होतात.

ताक व दह्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि शरीरातील उष्णता कमी करतात. नियमित 7 ते 8 तासांची झोप अवश्य घ्या.