प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालायला पुन्हा येतोय ‘बॅटमॅन’

681

डीसी कॉमिक्सचा सर्वात यशस्वी सुपरहिरो ‘बॅटमॅन’ लवकरच पुन्हा प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. 1939 साली डीसी कॉमिक मधून प्रसिद्ध झालेल्या या व्यक्तिरेखेने जवळपास 90 वर्षांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. बॅटमॅन सिरीजचा 2008 साली प्रदर्शित झालेला ‘द डार्क नाईट’ आणि 2012 मध्ये प्रदर्शित झालेला ‘द डार्क नाईट राईस’ हा चित्रपट अनेक जण अजूनही तितक्याच आवडीने पाहतात. अशातच आता बॅटमॅन सिरीजचा नवीन चित्रपट ‘द कॅप्ड क्रुसेडर’ येतोय. बॅटमॅन सिरींजचा हा नवीन चित्रपट 1988 साली प्रसिद्ध झालेल्या  ‘बॅटमॅन-द कॅप्ड क्रुसेडर’ या कॉमिकवर आधारित असणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक हे मॅट रीव्ह्ज करणार आहेत. तसेच ‘ट्वायलाइट सागा’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिकणारा अभिनेता रॉबर्ट पॅटिंसन हा बॅटमॅनच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी अभिनेता बेन अफ्लेक हा ‘जस्टीस लीग’ या चित्रपटात बॅटमॅनच्या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटात जो क्रेविज ही ‘कॅटवूमन’च्या तर जेफ्री राइट हा ‘जेम्स गॉर्डन’च्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली आहे. मात्र या चित्रपटासाठी प्रेक्षकांना काही काळ आणखीन प्रतीक्षा करावी लागण आहे. हा चित्रपट 25 जून 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या