खासदार अमोल कोल्हे 18 डिसेंबरला करणार मोठी घोषणा!

2598

अभिनेते आणि शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे 18 डिसेंबरला  मोठी घोषणा करणार आहेत. त्यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट टाकून ही माहिती दिली आहे. ‘येत्या 18 डिसेंबरला मोठी घोषणा करणार’ असे त्यांनी  ट्विटमध्ये म्हटले आहे. अमोल कोल्हेंच्या या फेसबुक पोस्टमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये भगवा रंग बॅकग्राऊंडला ठेवला आहे. ‘A Big Announcement……On 18 th December!!!’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.अनेकांनी  शिवनेरी किल्ल्यासंदर्भात घोषणा होईल, असा वर्तवला आहे. तर, बैलगाडा शर्यतीचा मुद्दावर घोषणा असेल, असा काहीजणांचा अंदाज आहे. काहींनी 18 डिसेंबर रोजी शेतकरी कर्जमाफी होईल असा अंदाज वर्तवला आहे.

कोल्हेंनी  फेसबुकवरुन पोस्ट करताना, बॅकग्राऊंडचा रंग भगवा निवडला आहे त्यामुळे येत्या 18 डिसेंबरला खासदार अमोल कोल्हे नक्की कोणती घोषणा करणार? याबाबत उत्सुकता आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या