नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला प्रचंड मोठे यश मिळाले. यामुळे शिवसेनेने आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महत्त्वाच्या पदांवर प्रमुख नेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांची विधानसभा 2024 करिता निवडणूक यंत्रणाप्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.