नदीत स्फोट, ठिणग्या आणि धूर… क्षिप्रा नदीच्या किनारी राहणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

kshipra-river

मध्यप्रदेशच्या उज्जैन येथील पवित्र क्षिप्रा नदीचे पात्र हे कुतुहलाचा विषय बनली आहे. या नदीत गेल्या काही दिवसांपासून सतत स्फोट होऊ लागले आहेत. ज्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झालं आहे. क्षिप्रा नदीवर त्रिवेणी स्टॉपडॅमजवळ बनवण्यात आलेल्या घाटाच्या भागात नदी पात्रात स्फोट होत आहेत. हे स्फोट होत असतानाच नदीच्या पात्रातून ठिणग्या आणि धूर देखील बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिला स्फोट 26 फेब्रुवारी रोजी झाला. त्यानंतर काही दिवसांच्या अंतराने हे स्फोट आहेत.

नदीच्या पात्रात ज्या ठिकाणी हे स्फोट होत आहेत, त्यापासून काही दूर अंतरावर पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी भाविक स्नान करतात. अशा वेळी स्थानिकांमध्ये या स्फोटाच्या घटनांमुळे भीतीचं वातावरण आहे. इथे जल संपदा विभागाच्या एका कर्मचाऱ्याला तैनात करण्यात आहे. स्थानिक जिल्हाधिकारी आशीष सिंह यांनी देखील या ठिकाणचा दौरा करून माहिती घेतली आहे.

‘आजतक’ सोबत बोलताना उज्जैनचे जिल्हाधिकारी आशीष सिंह यांनी सांगितले की ‘क्षिप्रा नदी आणि त्रिवेणी घाटावर आजूबाजूच्या भागात स्फोट होत आहेत. याची माहिती इथं काम कर असलेल्या कर्मचाऱ्यानं दिली असून गेल्या 5 दिवसांमध्ये 4 ते 5 वेळा स्फोट झाले आहेत.

उज्जैनच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांनी आणि ग्रामीणांनी स्फोटांचे व्हिडीओ बनवले. भूगर्भ तज्ज्ञांना माहिती मिळाल्यावर त्यांनी या भूगर्भीय हालचाली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासंदर्भात जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र लिहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या