एमपीएससी परीक्षेला कोणताही विलंब झालेला नाही, सुनील प्रभू यांनी अधिवेशनात मांडलेल्या सूचनेवर मुख्यमंत्र्यांनी दिले लेखी उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 ची अधिसूचना जारी करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांच्याकडून कोणताही विलंब झालेला नाही असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी विधिमंडळ अधिवेशनात यासंदर्भात मांडलेल्या सूचनेला मुख्यमंत्र्यांनी तसे लेखी उत्तर दिले आहे.

आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडलेल्या सूचनेला उत्तर देताना, संबंधित विभागाकडून सुधारित उत्तरतालिका (आन्सर की) प्राप्त झाल्यानंतरच आयोगाने पुढील प्रक्रिया सुरू केली होती, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात पुढे म्हटले आहे की, एमपीएससी ही स्वायत्त घटनात्मक संस्था असून, ती स्वतंत्रपणे परीक्षांचे आयोजन करते. तसेच उमेदवारांकडून प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार करण्यासाठी आयोग निर्धारित प्रक्रियेचे पालन करतो. शासनाने वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही या परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी मिळाली, असेही उत्तरात म्हटले आहे.