बीसीसीआयच्या करारातून धोनीला डच्चू; विराट, रोहित, बुमराह कोट्यधीश

16403

क्रिकेटच्या मैदानापासून दूर असणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे नाव बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने गुरुवारी वरिष्ठ खेळाडूंची कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जारी केली आहे. या यादीमध्ये धोनीच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या शक्यतांना बळकटी मिळत आहे.

बीसीसीआयने गुरुवारी ऑक्टोबर 2019 आणि सप्टेंबर 2020 या कार्यकाळासाठी वरिष्ठ खेळाडूंची कॉन्ट्रॅक्ट लिस्ट प्रसिद्ध केली. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. नव्या यादीमध्ये नवदीप सैनी, मयांक अग्रवाल, श्रेयस अय्यर, वाशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर यांचा समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयने ‘ग्रेड ए प्लस’, ‘ग्रेड ए’, ‘ग्रेड बी’ आणि ‘ग्रेड सी’ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ‘ग्रेड ए प्लस’ मधील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी, ‘ग्रेड ए’ मधील खेळाडूंना 5 कोटी, ‘ग्रेड बी’ मधील खेळाडूंना 3 कोटी आणि ‘ग्रेड सी’ मधील खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळतील.

  • ‘ग्रेड ए प्लस’मध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.
  • ‘ग्रेड ए’ मध्ये आर अश्विन, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे.
  • ‘ग्रेड बी’मध्ये रिद्धीमान सहा, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या आणि मयांक अग्रवालचा समावेश आहे.
  • ‘ग्रेड सी’ केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर आमि वाशिंग्टन सुंदर यांच्या नावाचा समावेश आहे.
आपली प्रतिक्रिया द्या