…तर धोनी टी-20 विश्वचषकात महत्त्वाची कामगिरी बजावेल!

982

टीम इंडियाचा फिनिशर अशी ओळख असलेल्या महेद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यास त्याचा समावेश टी-20 विश्वचषक क्रिकेट सामन्यांसाठी टीम इंडियाच्या संघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल सामन्यांबाबत अनिश्चितता आहे. तसेच धोनीचा संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग संघाचे सराव शिबिरही थांबवण्यात आले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महेंद्रसिंग धोनीच्या संघात समावेश होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी प्रसिद्ध फलंदाज वसीम जाफर यांनी धोनीच्या संघातील समावेशाबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

धोनी फिट असून तो चांगल्या फॉर्ममध्ये असेल तर टी-20 विश्चषकात धोनी टीम इंडियासाठी मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत जाफर यांनी व्यक्त केले आहे. धोनी संघात असल्याने यष्टीरक्षणाचा प्रश्नही उपस्थित होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तो संघात असल्याने के.एल. राहुल आणि ऋषभ पंत या खेळाडूंवर दबाव येणार नाही आणि त्यांना त्यांची चमक दाखवता येणार आहे. त्यामुळे धोनीचा संघात समावेश होण्याची शक्यता जाफर यांनी व्यक्त केली आहे. त्याचा संघात समावेश झाल्यास तो संघासाठी महत्त्वाची कामगिरी बजावेल, असेही ते म्हणाले.

टी -20 विश्वचषकासाठी महेंद्रसिंग धोनीचा संघात समावेश होणे कठीण असल्याचे मत टीम इंडियाचा माजी सलामीवर वीरेंद्र सहेवाग याने नुकतेच व्यक्त केले होते. निवड समिती नेहमी पुढच्या सामन्यांचा विचार करत असते. फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंचा समितीकडून विचार करण्यात येत नाही, असेही सेहवाग म्हणाला होता. आता के.एल. राहुल फलंदाजीसह यष्टीरक्षणही करत आहे. तसेच ऋषभ पंतचाही यासाठी विचार करण्यात येऊ शकतो. त्यामुळे आय़पीएलमध्ये चमक दाखवली तरी टी-20 विश्वचषकासाठी धोनीचा टीम इंडियात समावेश होणे कठीण असल्याचे सेहवागने म्हटले होते. आता सेहवाग याच्या मताविरोधातच जाफर यांनी मत व्यक्त केल्याने धोनीच्या संघातील समावेशाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या