महावितरणचा ‘लेट’ कारभार! ऑनलाईन भरलेल्या वीज बिलाची पोच पाच दिवसांनी ई-मेलवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी ऑनलाईन किंवा मोबाईल अॅपद्वारे वीज बिल भरण्याबाबत महावितरणकडून आवाहन केले जात आहे.

त्यानुसार लाखो ग्राहक या डिजिटल पर्यायांद्वारे वीज बिल भरत आहेत. मात्र महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन वीज बिल भरल्यानंतर त्याची पोच पावती तत्काळ नोंदणीकृत ई-मेलवर येणे अवश्यक असतानाही ती पाच-सहा दिवसांनी ई-मेलवर उपलब्ध होत आहे. महावितरणच्या या ‘लेट’ कारभाराबाबत ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

याआधी ऑनलाईनद्वारे वीज बिल भरल्यानंतर तत्काळ त्यांच्या पोच ई-मेलवर मिळत होती. पण गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाईन वीज बिल भरल्यानंतर त्याची पोच ई-मेलवर येण्यास पाच-सहा दिवस लागत आहेत.