
कालिया, गुंडा, कोई मिल गया, सूर्यवंशम, लोफर, इंडियन, दम सारख्या प्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भुमिका पार पडत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या मुकेश ऋषी यांनी 90 चं दशक गाजवलं. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या मातब्बर अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं. मात्र, धर्मेंद्र यांच्यासोबतची त्यांची एक आठवण त्यांनी आपल्या आयुष्याच्या डायरीत जपून ठेवली आहे. 2024 साली एका मुलाखतीमध्ये मुकेश ऋषी यांनी हा किस्सा सांगितला होता.
धर्मेंद यांना “ही-मॅन” या नावानेही ओळखलं जातं. याच ही-मॅन सोबत मुकेश ऋषी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. धर्मेंद्र यांच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांमध्ये मुकेश ऋषी यांचा सुद्धा समावेश आहे. Radio Nasha Official ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी धर्मेंद यांच्यासोबतची पहिल्या चित्रपटाची एक आठवण सांगितली होती. ते म्हणाले की, जेव्हा मला पहिल्यांदा समजलं की धर्मेंद्र सेटवर येत आहेत, तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो नाही. मी मला दिलेले डायलॉग वाचत राहिलो, असे मुकेश ऋषी म्हणाले.
‘वीरूची एक्झिट’.. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
“जेव्हा मी शूटिंगसाठी सेटवर पोहोचले तेव्हा ते आधीच तिथे उपस्थित होते, पण मी त्यांच्याकडे बघीतले नाही. मी माझा सीन करण्यासाठी गेलो. पण शूट संपताच मी धर्मेंद्र साहेबांकडे धावत आलो आणि त्यांच्या पाया पडलो. सीन शूट करण्यापूर्वी जर मी त्यांच्याकडे पाहिले असते तर मी तो सीन अजिबात शूट करू शकलो नसतो. कारण माझ्या डोळ्यात त्यांच्याबद्दल आदर होता. मोठ्यांचा सन्मान करण आपल्याला कोणी शिकवत नाही. ते आपलं आपल्याला शिकावं लागतं.” अशी आठवण मुकेश ऋषी यांनी तेव्हा सांगितली होती. आठवण सांगताना ते भावूक झाल्याचा सुद्धा पाहायला मिळालं होतं.
मुकेश ऋषी आणि धर्मेंद्र सिंह यांनी ‘हमला’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं. ‘हमला’ चित्रपटाव्यतिरिक्त ‘जियो शान से’, ‘न्यायदाता’ आणि ‘लोह पुरूष’ या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे.

























































