‘मुल्क’वर पाकिस्तानात बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुल्क हा चित्रपट मुस्लिमविरोधी असल्याचा दावा करत पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या प्रदर्शनानावर बंदी घातली आहे. हा चित्रपट ३ ऑगस्टला पाकिस्तानात प्रदर्शित होणार होता. दरम्यान, पाकिस्तानने घातलेल्या बंदीवर अनुभव सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये प्रेम आणि बंधुभाव वाढावा, हाच संदेश या चित्रपटातून देण्यात आल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. ‘मुल्क’मध्ये ऋषी कपूर, तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका आहे. यापूर्वीही पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाने पॅडमॅन, वीरे दी वेडिंग अशा काही सिनेमांवर बंदी घातली होती.