मुंबईत 1274 नवे कोरोना रुग्ण, 57 जणांचा मृत्यू

818

मुंबईत गेल्या एकाच दिवसांत १२७४ नवे कोरोनाबाधित रुग्ण नोंदवले गेले असून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ४७ हजार १२८ झाली असून मृतांचा आकडा १५७५ वर पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या एकाच दिवसात ११८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या १९ हजार ९७८ वर पोहोचली आहे.

मुंबईत गेल्या एकाच दिवसांत मृत झालेल्या ५७ जणांमध्ये ३४ पुरुष आणि २३ महिलांचा समावेश आहे. यामधील २१ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त होते. तर २९ जणांचे वय ४० ते ६० वर्षांदरम्यान आणि ७ जणांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी होते. मुंबईतील ५ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार १२ वॉर्डमध्येच मुंबईतील एकूण रुग्णांच्या तुलनेत निम्मे म्हणजे ३१ हजार ३८७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जी/उत्तर विभागात सर्वाधिक ३३७२, एल वॉर्डमध्ये २९७४, के पूर्वमध्ये २८४१, एफ उत्तरमध्ये २८३०, ई वॉर्डमध्ये २८११, के पश्चिममध्ये २६७९, एच पूर्वमध्ये २५६८, एफ दक्षिणमध्ये २४००, जी दक्षिणमध्ये २३१५, एन वॉर्डमध्ये २२७१ एम पूर्व मध्ये २२४६ आणि एस वॉर्डमध्ये २०८० रुग्ण आढळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या