विमानतळावर किल्ले शिवनेरी

1453

12 मार्च 2020. फाल्गुन वद्य तृतीया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवप्रभूंचा जन्मदिन. शिवसेनेच्या वतीने या तिथीनुसार शिवजयंती मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ शिवछत्रपतींच्या भव्य पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवजन्मस्थान शिवनेरीची प्रतिकृती उभारली जात आहे.

भारतीय कामगार सेना आणि परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्या 80 कारागीरांची टीम संपूर्ण फायबर ग्लास मटेरियलचा वापर करून 105 फूट लांब, 35 फूट रुंद आणि 22 फूट उंच शिवनेरी साकारत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या