मुंबईतील 16 हजारांहून अधिक सोसायट्या पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत

434
प्रातिनिधिक फोटो

शहरातील जीर्ण इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुनर्विकासाची गरज असलेल्या सोसायट्यांची संख्या तब्बल 16 हजारांहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सोसायट्यांचा वेळीच पुनर्विकास करण्यासाठी स्वयंपुनर्विकास हाच योग्य पर्याय असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे. अशा स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना 85 टक्के अर्थसाहाय्य करून मुंबै बँक मदतीचा मोठा हात देत आहे.

मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत इमारत कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विविध कारणांमुळे सोसायट्यांचा पुनर्विकास रखडून दुर्घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुनर्विकास वेळीच मार्गी लागण्याची गरज व्यक्त होत आहे. स्वयंपुनर्विकास हा अशा सोसायट्यांच्या विकासासाठी उत्तम पर्याय असल्याचा निष्कर्ष तज्ञांनी काढला आहे. स्वयंपुनर्विकासामध्ये सदनिकाधारकांच्या व्यापक हिताबरोबरच प्रकल्प खर्चात पारदर्शकता राहते. त्याचबरोबर खासगी बिल्डरांकडून होणारी प्रकल्पांची रखडपट्टी टाळता येते. सोसायटी जुन्या विकासकाला बदलू शकते, तसेच सल्लागार आणि कंत्राटदाराची नेमणूक करू शकते. या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी मुंबै बँक प्रकल्प खर्चाच्या 85 टक्के अर्थसाहाय्य करून मदतीचा मोठा हात देत आहे. शहरातील तब्बल 16 हजारांहून अधिक सोसायट्यांच्या पुनर्विकासाची गरज आहे. बर्‍याच इमारतींची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. खासगी बिल्डरांकडे या सोसायट्यांचा पुनर्विकास सोपवल्यास रखडपट्टी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर स्वयंपुनर्विकास हा उत्तम पर्याय मानला जात आहे. अशा प्रकल्पांना चालना देण्यासाठी मुंबै बँकेप्रमाणेच इतर वित्तीय संस्थांनीही अर्थसाहाय्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी भावना व्यक्त होत आहे.

वुई डेव्हलपमेंटची सोसायट्यांना मदत

आजच्या घडीला स्वयंपुनर्विकासासाठी सोसायट्यांनाएक खिडकीयोजना हवी आहे. अशा सोसायट्यांना कर्जाची व्यवस्था, सरकारी नियमावली तसेच कायदेशीर बाबींची पूर्तता करणे यासाठीवुई डेव्हलपमेंटही संस्था मदत करत आहे. पुनर्विकाससंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणे, संभाव्य धोके टाळणे, अंतिमत स्वयंपुनर्विकास यशस्वी करणे यात सोसायट्यांना आमचे नेहमीच सहकार्य असेल, असेवुई डेव्हलपमेंटचे संचालक प्रणय गोयल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या