मुंबईस्थित कुडाळ, मालवणवासीयांची बुधवारी शिवसेना भवन येथे बैठक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कुडाळ-मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेले चाकरमानी, शिवसेना पदाधिकारी, ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक बुधवार, 28 ऑगस्ट रोजी शिवसेना भवन,  दादर येथे होणार आहे.

बुधवारी सायंकाळी 7 वाजता शिवसेना भवन येथे होणाऱ्या या बैठकीला कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, विरार, वसई व मुंबईच्या इतर भागात वास्तव्यास असलेल्या मुंबईस्थित कुडाळ-मालवणवासीयांनी मोठय़ा संख्येने बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – पंढरीनाथ तावडे – 9322909277.