
गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात भाविक दर्शनासाठी बाहेर पडतात. या काळात पादचाऱ्यांना चालताना अडथळा निर्माण होईल, अशा प्रवारे रस्ते आणि पदपथांवर अनधिकृत जाहिराती प्रदर्शित करू नयेत आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवादरम्यान व्यावसायिक जाहिरातींच्या प्रदर्शनासाठी महापालिकेकडून नियम जारी करण्यात आले आहेत.
‘पादचारी प्रथम’ अभियानासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून पालिका प्रशासन आणि परवाना विभागाने (लायसन्स) या नियमांचे पालन करून अडथळे ठरणारे जाहिरात फलक त्वरित काढून टाकण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.



























































