रिक्षाचालकाकडून शालेय विद्यार्थीनीचा विनयभंग, मुंबईतील धक्कादायक प्रकार

प्रातिनिधिक फोटो

बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर लैंगीक अत्याचार केल्याच्या घटनेने राज्यभर संताप पसरला असताना आता मुबंईतील एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका रिक्षाचालकाने एका 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. मुंबईतील बोरिवली येथे ही धक्कादायक घटना घडली असून याबाबत रविवारी पोलिसांनी माहिती दिली.

एमएचबी कॉलनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी शाळेत जात असताना ही घटना घडली आहे. रिक्षाचालकाने अचानक रिक्षा थांबवली आणि त्या मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आणि जोरात मदतीसाठी लोकांना आवाज दिला. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून तिथले स्थानिक आवाजाच्या दिशेने धावले, मात्र तोपर्यंत रिक्षाचालक फरार झाला होता.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रिक्षाचालकाचा शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक केली आहे.