मुंबईकर अमोलने बनवलेले विमान अखेर भरारी घेणार

782

चारकोप येथील इमारतीच्या टेरेसवर बनवलेल्या सहाआसनी विमानाच्या टेकऑफसाठी मुंबईकर कॅप्टन अमोल यादव यांना अखेर डीजीसीएकडून विशेष उड्डाण परमीट मिळाले आहे. हिंदुस्थानात पहिल्यांदाच अशा प्रकारचे परमीट दिले गेले आहे. कॅप्टन यादव यांनी याबाबत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.

कॅप्टन अमोल यादव यांनी कुटुंबीयांच्या मदतीने सहा कोटी रुपये खर्चून स्वदेशी प्रायोगिक विमान बनवले. ते चालवण्यासाठी आवश्यक असलेले उड्डाण परमीट मिळवण्यासाठी कॅप्टन यादव हे 2011पासून प्रयत्न करत होते. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या उपक्रमाकडे पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधले. त्यानंतर पंतप्रधानांच्या निर्देशाला अनुसरून डीजीसीएने कार्यवाहीला गती दिली आणि कॅप्टन यादव यांना विमानाच्या उड्डाणासाठी सशर्त परवानगी दिली आहे. डीजीसीएचे प्रमाणपत्र मिळताच कॅप्टन यादव यांनी रविवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

  • विमानाच्या पहिल्या उड्डाणाला 10 हजार कोटी फूट इतकी उंची आणि दहा तासांचा वेळ अशी अट घालण्यात आली आहे. या उड्डाणावर हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेडचे फ्लाईट टेस्ट तज्ञ विंग कमांडर लगनजीत बिस्वाल यांचे नियंत्रण राहणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या