सीबीएसईचा वाचन उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी सीबीएसई बोर्डाने स्टोरीविव्हरसोबत भागीदारी केली असून दोन वर्षांचा वाचन उपक्रम आखला आहे. येत्या 20 सप्टेंबरपासून हा उपक्रम शाळांमधून सुरू होणार आहे. या उपक्रमाला सेंट्रल स्क्वेअर फाऊंडेशनने अर्थसहाय्य केले आहे. या उपक्रमाचा लाभ केंद्रीय आणि नवोदय विद्यालय, सरकारी अनुदानित तसेच खासगी अशा सुमारे 25 हजार शाळांना मिळणार आहे. या उपक्रमातंर्गत इंग्रजीसह हिंदी भाषेतील दर्जेदार मराठीची पुस्तके, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक साहित्य उपलब्ध असतील. प्रथम बुक्सच्या स्टोरीविव्हरवर ही पुस्तके उपलब्ध आहेत. शिक्षकांनाही प्रशिक्षण साहित्य देण्यात येणार आहे. ‘टिचर कनेक्ट’ या कार्यक्रमाद्वारे ऑनलाइन वाचनसत्र होतील. तसेच शिक्षकांना आपली मते, विचार मांडता येतील. या उपक्रमाची सुरुवात एका ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली. या कार्यक्रमाला सीबीएसईचे अभ्यासक्रम संचालक डॉ. जोसेफ इम्मान्युअल, अध्यक्ष मनोज अहुजा, प्रथम बुक्सचे अध्यक्ष आर. श्रीराम आदी उपस्थित होते.