
मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस असे नामांतर करण्यासाठी नानांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला नानाप्रेमींनी बुधवारी ‘उपरोधिक’ आंदोलन केले. 31 जुलै रोजी नानांच्या पुण्यतिथी दिनी ही घोषणा होणार आणि 15 ऑगस्टला टर्मिनसचे लोकार्पण होणार अशी ‘ब्रेकिं’ न्यूजही यावेळी उपरोधिकपणे देण्यात आली. यावेळी नाना शंकरशेट नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. मनमोहन चोणकर, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, दिनकर बायकेरीकर, चंद्रशेखर दाभोळकर, डॉ. विवेक रायकर, दिलीप मालंडकर, अजित पितळे, सुभाष हरचेकर, जीवन कांदळगावकर, मोहन म्हाप्रळकर, चंद्रकांत पाटणकर, जयंत पेडणेकर, सुधीर पोतदार, जयवंत मालणकर,नंदकिशोर वळीवडेकर, शंकरशेट पुटुंबीय आदी उपस्थित होते.