मुंबईसह सात रेल्वे स्थानके उडवण्याची ‘जैश’ची धमकी

643

मुंबईसह देशातील सात रेल्वे स्थानके आणि सहा राज्यांतील मंदिरांमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिली. हरयाणातील रोहतक रेल्वे स्थानक अधिकाऱ्याला ‘जैश’च्या धमकीचे पत्र मिळाले आहे. सदर पत्रात 8 ऑक्टोबरपर्यंत सहा राज्यांतील मंदिरांमध्ये जैश स्फोट घडविणार असल्याचा दावा केला आहे.

कश्मीरातील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न करीत आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरची गुपचूप तुरुंगातून सुटका केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिली होती तर गेल्या महिन्यात गुजरातमधील कच्छमध्ये एक संशयित बोट लष्कराला सापडली होती. त्यानंतर नौदल प्रमुखांनीही समुद्रमार्गाने दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. हरयाणातील रोहतक रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांना ‘जैश’च्या धमकीचे पत्र मिळाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हे पत्र रोहतक रेल्वे जंक्शन अधीक्षकांच्या नावे पाठवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या