
वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार आहे. याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग तसेच मुंबई महापालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम साकारला जात आहे. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाची घोषणा केली. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, पालिका आयुक्त भूषण गगराणी, विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व सीईओ शिशिर जोशी उपस्थित होते. क्लायमेट वीकचा मुख्य कार्यक्रम 17 ते 19 फेब्रुवारीला या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडणार आहे.


























































