
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या शपथविधीसाठी शिवतीर्थावर गुरुवारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून लाखोंची गर्दी लोटली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सातजणांचा शपथविधी डोळे दिपतील अशा अभूतपूर्व सोहळ्यात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांसह असंख्य जनता उपस्थित होती.

बुधवारपासूनच महाराष्ट्राच्या विविध भागांतून कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. गुरुवारी सकाळपासूनच शिवतीर्थाच्या परिसरात कार्यकर्ते जमा होऊ लागले होते. दुपारनंतर शिवतीर्थाकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. भगव्या टोप्या, भगवी उपरणी घातलेले शिवसैनिक भगवे झेंडे फडकवत तर पांढऱयाशुभ्र कपडय़ांतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे उंचावत शिवतीर्थावर पोहचले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिमाही अनेकांच्या हातांत दिसत होत्या. शेतकरी, कष्टकरी, वारकरी आणि सामान्य नागरिकही मोठय़ा संख्येने शपथविधीसाठी आले होते.

शेतकऱयांसाठी जिवाचे रान करणाऱया शिवसेनेने या शपथविधी सोहळ्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबीयांना आवर्जून निमंत्रित केले होते. त्यांच्यासह राज्यातील हजारो शेतकरीही आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून या सोहळ्यासाठी मुंबईत आले होते. अनेक शेतकऱयांनी डोक्यावर ‘मी मुख्यमंत्री शेतकरी’ अशा टोप्या तसेच गळ्यामध्ये फलक घातले होते. त्याचबरोबर अनेकांनी ‘मी मुख्यमंत्री शिवसैनिक’ अशा पाटय़ाही घातल्या होत्या. प्रत्येकजण ‘आपलं सरकार आलं’ असे छाती ठोकून सांगत होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभाशीर्वाद दिले त्यावेळचा भावनिक क्षण

शपथविधीआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली. यावेळी सौ. प्रतिभाताई पाटील आणि सौ. रश्मी ठाकरे तसेच आमदार आदित्य ठाकरे यांच्यात कौटुंबिक चर्चा झाली.

पवार साहेब इज द पॉवर!
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आणण्यात सिंहाचा वाटा असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ‘पवारसाहेब इज द पॉवर’ असे लिहिलेले फलक उंचावत या शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झाले होते.

मी मुख्यमंत्री शेतकरी!
शेतकऱयांसाठी जिवाचे रान करणाऱया शिवसेनेने या शपथविधी सोहळ्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबीयांना आवर्जून निमंत्रित केले होते. त्यांच्यासह राज्यातील हजारो शेतकरीही आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून या सोहळ्यासाठी मुंबईत आले होते. अनेक शेतकऱयांनी डोक्यावर ‘मी मुख्यमंत्री शेतकरी’ अशा टोप्या तसेच गळ्यामध्ये फलक घातले होते. त्याचबरोबर अनेकांनी ‘मी मुख्यमंत्री शिवसैनिक’ अशा पाटय़ाही घातल्या होत्या. प्रत्येकजण ‘आपलं सरकार आलं’ असे छाती ठोकून सांगत होता.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सोबत सौ. रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील आदी उपस्थित होते























































