गोरेगावच्या नेस्को कोरोना सेंटरचे काम पूर्ण; कोरोना रुग्णांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

1076

गोरेगाव येथील नेस्को मैदानावर 1 हजार 240 खाटांच्या क्षमतेच्या कोरोना काळजी केंद्र 2 (CCC 2) काम पूर्ण झाले असून लवकरच हे केंद्र सुरू केले जाणार आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातही कोरोना रुग्ण वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून हे केंद्र उभारण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर इथे उपचार केले जाणार आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेने मुंबईतील मोकळी मैदाने, एक्सिबिशन सेंटर, मोठी सभागृहे ताब्यात घेऊन कोरोना सेन्टर्स सुरू केली आहेत. यामध्ये महालक्ष्मी रेसकोर्स येथे 300, बीकेसी मैदान येथे हजार तर गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये सर्वाधिक 1,240 बेडचे कोरोना सेंटर उभारण्यात आले आहे. हे सेंटर सर्व परीने अत्यावश्यक सेवा पुरवणार आहे. नेस्को केंद्रामध्ये रुग्णांना ऑक्सिजन पुरवठादेखील उपलब्ध असून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिले जाणार आहेत. पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत. या केंद्राची आवश्यकतेनुसार क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, सहआयुक्त (दक्षता) आशुतोष सलील यांनी आज पाहणी केली आणि प्रगतीचा आढावा घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या