मुंबईत रुग्ण 400 पेक्षा कमी, आज 481 कोरोनामुक्त

प्रातिनिधिक फोटो

कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आज मुंबईत दिवसभरात 395 रुग्ण आढळले. कोरोना काळातील आतापर्यंतची ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

दरम्यान, आज दिवसभरात 481 कोरोनामुक्त झाले असून रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 409 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱ्या 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या 11 हजार 249 वर पोहोचली आहे.

राज्यातही रुग्णसंख्येत नीचांकी घट

कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज दिवसभरात 1 हजार 924 रुग्ण आढळले. कोरोना काळात रुग्णसंख्येतील ही सर्वात नीचांकी घट आहे. रिकव्हरी रेट 94.86 टक्क्यांवर पोहोचला असून 3 हजार 854 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 35 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.53 वर आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या