मुंबईत दिवसभरात 499 कोरोनामुक्त, रुग्ण दुपटीचा कालावधी 523 दिवसांवर

प्रातिनिधिक फोटो

कोरोना विरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत आज दिवसभरात 499 कोरोनामुक्त झाले तर 434 जणांना कोरोना झाला. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 523 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतील विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या 11 हजार 319 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एपूण संख्या 2 लाख 89 हजार 300 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 523 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 644 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 27 लाख 42 हजार 466 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 3 लाख 7 हजार 169 वर पोहोचली आहे. दरम्यान, आज धारावीत चौथ्यांदा तर दादरमध्ये तिसऱयांदा एकही कोरोना रुग्ण सापडला नाही.

राज्याचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज दिवसभरात 2 हजार 556 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 2 हजार 151 कोरोना रुग्णांची नोंद झाली.

आपली प्रतिक्रिया द्या