मुंबईत दिवसभरात 477 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत सलग सोळाव्या दिवशीही कोरोना रुग्णांची संख्या हजारच्या आत आली आहे. सोमवारी दिवसभरात 477 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 533 जण कोरोनामुक्त झाले. मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू आज झाल्याने एकूण मृतांची संख्या 10 हजार 988 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 66 हजार 695 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 327 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 9 हजार 68 वर पोहोचली आहे.