
मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1372 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 73 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1 हजार 698 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 52 हजार 392 वर पोहोचली आहे.
मुंबईतील गेल्या 48 तासांत 73 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 4759 झाली आहे. 58 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 49 पुरुष तर 24 महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 4 जणांचे वय हे 40 वर्षाखाली होते, 40 जणांचे वय हे 60 वर्षांवर होते तर उर्वरित 29 रुग्ण हे 40 ते 60 वर्षांदरम्यान होते. मुंबईत सध्या कोरोनाचे 24 हजार 483 सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचा डबलिंग रेट हा 41 दिवसांवर आला आहे.




























































