मुंबईत 1311 नवे रुग्ण, 69 जणांचा मृत्यू

355

मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1311 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 69 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 2,420 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 55 हजार 883 वर पोहोचली आहे.

मुंबईतील गेल्या 48 तासांत 69 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 4 हजार 896 झाली आहे. मुंबईत कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत असून रविवारी 2,420 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या 23 हजार 346 वर आली आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचा डबलिंग रेट आता 41 दिवसांवरून 43 दिवसांवर आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या