मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संजय पुमार हे होम क्वारंटाईन झाले आहेत.

गेल्या आठवडय़ात शुक्रवारी मुख्य सचिव कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱयांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीत संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. शनिवारी पॉझिटिव्ह अहवाल आल्यापासून संजय कुमार होम क्वारंटाईन झाले आहेत.

वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली असून सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जनतेचे प्रेम आणि सर्वांच्या शुभेच्छांबरोबरच या काळात योग्य आहार, योगा, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या