
औरंगजेबाचे गुणगान गात त्याची स्तुती करणाऱ्या आमदार अबू आझमी यांचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायधीश अजय गडकरी व राजेश पाटील यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ”आपल्याला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरांची स्थापना केली होती. त्यामुळे आपण औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील युद्ध राज्य कारभाराचे होते. त्यात कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी किनार नव्हती, असे वक्तव्य आझमी यांनी केले होते. त्यानंतर अबू आझमींवर टीकेची झोड उठली होती तसेच गुन्हा दाखल करण्यात आला होता