मुलुंड, दहिसर, रेसकोर्स, बीकेसीतील सुसज्ज कोरोना केंद्रात 3,520 बेड उपलब्ध होणार

502

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, रुग्णांचा आकडा वाढला तर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत म्हणून मुंबई महानगरपालिकेने मुलुंड, दहिसर, रेसकोर्स, बीकेसीमध्ये उभारलेल्या सुसज्ज कोरोना केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवार, 7 जुलैला दुपारी 1.30 वाजता व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे होणार आहे. या चार केंद्रातून एकूण 3,520 बेड उपलब्ध होणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुलुंडमध्ये लालबहादूर शास्त्री मार्गालगत 1 हजार 700 खाटांचे कोरोना केंद्र ‘सिडको’च्या पुढाकाराने उभारण्यात आले आहे. यातील सुमारे 500 बेड ठाणे महानगरपालिकेतील रुग्णांसाठी आरक्षित आहेत. दहिसर (पूर्व) येथे ‘मुंबई मेट्रो’च्या सहकार्याने सुमारे 900 खाटांचे तर दहिसर (पश्चिम) येथे कांदरपाडामध्ये कोरोना रुग्णालय उभारण्यात आले असून या ठिकाणी 108 आयसीयू बेड उपलब्ध आहेत. महालक्ष्मी रेसकोर्स येथे 700 बेड तर वांद्रे-कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने दुसर्‍या टप्प्यातील कोरोना केंद्रात 112 आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. ‘एमएमआरडीए’ने हा दुसरा टप्पादेखील महानगरपालिकेकडे हस्तांतरित केला असून तो मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केल्यानंतर कार्यान्वित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या