लोकलमध्ये विनयभंग; वृद्धाला अटक

लोकलमधून फलाटावर उतरत असताना गर्दीचा गैरफायदा घेत महिला प्रवासीचा विनयभंग केल्याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी एका 62 वर्षीय वृद्धाला अटक केली आहे. एक महिला तिच्या मित्रांसह अप सीएसटी लोकलने कल्याण दिशेकडील पुरुषांच्या चौथ्या डब्यातून प्रवास करत होती. ती दादर स्थानकात उतरत असताना झालेल्या गर्दीच्या वेळेस एका अज्ञात व्यक्तीने तिचा विनयभंग केला. हा प्रकार कळताच महिलेने दादर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग करणाऱया दर्शनकुमार माखन या वृद्धाला अटक केली.