गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या महिलेला उपचारासाठी ठगाने चुना 8 लाख रुपयांना चुना लावला आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार महिला या विलेपार्ले येथे राहतात. 2021 पासून त्याना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानी अनेक डॉक्टरांकडे उपचार केले. मात्र काही फरक पडला नाही. गेल्या वर्षी त्या साडी खरेदीसाठी विलेपार्ले येथे गेल्या होत्या. त्या लंगडत चालत असल्याचे पाहून एक जण त्याच्याजवळ आला. त्याने महिलेशी संवाद साधला. ठाण्यात एक डॉक्टर असून त्याच्याकडे आपल्या आईने उपचार घेतले. उपचार घेतल्यापासून तिला गुडघेदुखीचा त्रास बंद झाल्याच्या त्याने भूलथापा मारल्या. त्या डॉक्टरकडे कोणतीही शस्त्रक्रिया होत नाही. तसेच तो घरी येऊन उपचार करतो असे महिलेला सांगितले. महिलेने पह्न केल्यानंतर डॉक्टर महिलेच्या घरी आला. तुम्हाला बरे करू असे त्याने सांगितले. त्याने महिलेला किचन मधून हळद आणण्यासाठी सांगितली. हळद तिच्या पायाजवळ पकडून कापली आणि त्यातून पिवळे द्रव्य बाहेर पडत असल्याचे सांगितले. त्या लिक्विडचे 8 लाख रुपये द्यावे लागतील असे तिला सांगितले. असे करून उपचाराच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने सव्वा सहा लाख रुपये उकळले.