
जॉय रायडिंगसाठी दुचाकी चोरून पसार होणाऱ्याच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यावर दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. चिराबाजार येथील सीताराम भवन इमारतीत राहणाऱया राकेश पटवा (59) यांनी त्यांची दुचाकी इमारतीखाली पार्क केली होती, पण ती अज्ञात चोराने चोरून नेली. याप्रकरणी पटवा यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यावर सपोनि प्रशांत कांबळे, उपनिरीक्षक प्रणाली जगताप व पथकाने तपास सुरू केला. जवळपास 90 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पटवा यांची दुचाकी जोगेश्वरी येथे राहणाऱया मोहम्मद अबरार शेख (45) याने चोरल्याचे निष्पन्न झाले. मग कांबळे व जगताप यांनी खबऱयांच्या मदतीने त्याला उचलले. त्याच्याकडून पटवा यांची चोरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली.