दादर, माहीम, धारावीत कोरोनाविरोधात मोर्चेबांधणी, आजपासून 10 ठिकाणी चाचणी शिबिरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona

मुंबई महानगरपालिकेकडून शहरात 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणी सुरू असतानाच दादर, माहीम आणि धारावीत कोरोनाविरोधात पुन्हा मोठय़ा प्रमाणात मोर्चेबांधणी करण्यात आली असून आठवडाभर 10 ठिकाणी विशेष मोफत कोरोना चाचणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. सोमवार, 23 ते शनिवार, 28 नोव्हेंबरपर्यंत ही विशेष कोरोना चाचणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नसली तरी पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम आणि सतर्प आहे. त्या पार्श्वभूमीवर, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीसह मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण आणि बाजारपेठ असलेल्या दादरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी पालिकेच्या जी/उत्तर विभागातर्फे सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत मोफत कोरोना चाचणी शिबिरे घेतली जाणार आहेत. यात अँटिजेन आणि आरटी-पीसीआर चाचण्या केल्या जाणार आहेत. जी/उत्तरमध्ये कोरोनाचे आज 24 रुग्ण सापडले.

हॉटेल्स कर्मचाऱयांच्या चाचण्या होणार

मुंबईत दिवाळीत झालेली गर्दी पाहता हॉटेल्स, उपाहारगृहांमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांच्या कोरोना चाचण्याही केल्या जाणार आहेत. यासाठी हॉटेल्स मालक संघटना असलेल्या ‘आहार’नेही पाठिंबा दिला आहे. दादरच्या आस्वाद हॉटेलमध्ये सोमवार, 23 नोव्हेंबरला 10 ते 2 च्या दरम्यान हॉटेल्स कर्मचाऱयांसाठी अँटिजेन-आरटीपीसीआर चाचण्या केल्या जाणार आहेत. विविध भाजी मार्पेटमध्ये चाचण्या पूर्ण झाल्या असून आता हॉटेल्स कर्मचाऱयांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती जी/उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.