मुंबईहून दोहाला जाणारे इंडिगोचे विमान रद्द; 300 हून अधिक प्रवासी अडकले

indigo

इंडिगोचे मुंबई ते दोहा हे विमान 6E 1303 तांत्रिक अडचणींमुळे रविवारी रद्द करण्यात आले. विमानाचे उड्डान करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही दीर्घ विलंबामुळे विमान कंपनीला उड्डाण रद्द करावे लागले. एएनआयच्या वृत्तानुसार, या फ्लाइटमध्ये 250 ते 300 प्रवासी असून ते सध्या मुंबई विमानतळावर अडकले आहेत. हे विमान पहाटे 4 वाजता निघणार होते.

दरम्यान, इंडिगोच्या प्रवक्त्याने उड्डान रद्द केल्यामुळे प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी हॉटेल रुममध्ये त्यांची व्यवस्था केली जात आहे. तसेच त्यांना त्यांच्या अंतिम स्थानावर नेण्यासाठी इतर फ्लाइटमध्ये बुकिंग करण्यात येत असल्याची माहिती यावेळी इंडिगोच्या प्रवक्त्याने दिली आहे. यापूर्वी जेव्हा कारणास्तव विमाानाचे उड्डान रद्द करण्यात आले. तेव्हाही प्रवाशांना पाच तास विमानात बसण्यास सांगितले जात होते. प्रवाशांना विमानातून उतरण्याची परवानगी नव्हती.

रविवारी झालेल्या विमानातील तांत्रिक समस्यांमुळे, प्रवाशांना विमानतळाच्या होल्डिंग एरियामध्ये त्यांना थांबण्याची विनंती करण्यात आली. प्रवाशी तब्बल 5 तास होल्डिंग एरियामध्ये थांबले होते. मात्र यामुळे प्रवाशांना अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या होत्या. प्रवाशांसाठी अन्न किंवा पाण्याची सोय देखील केली गेली नव्हती. एवढेच नाही तर एअरलाइन्सचा कोणताही अधिकारी त्यांच्याशी बोलण्यास तयार नव्हता.असे अनेक आरोप विमानात अडकलेल्या प्रवाशांनी केले आहेत.