आदित्य ठाकरे यांना मच्छीमार कृती समितीचा पाठिंबा!

838

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि महायुतीचे वरळीचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने गुरुवारी वरळीतील प्रेमनगर येथे झालेल्या सभेत पाठिंबा जाहीर केला.

कोळीवाडा गावठण सीमांकन क्रॉफर्ड मार्केट कोळी मच्छी विक्रेता महिलांचे प्रश्न तसेच मच्छीमारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शिवसेनेने नेहमीच सहकार्य केले आहे. आदित्य ठाकरे हे तरुण, तडफदार, युवा नेते असून ते कोळी समाजाचे प्रश्न निश्चित मार्गी लावतील. त्यांचे सहकार्य कोळी बांधवांना सातत्याने मिळेल, हे लक्षात घेऊन आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी राज्यमंत्री सचिन अहीर, विभाग संघटक किशोरी पेडणेकर, युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत मच्छीमार नेते दामोदर तांडेल आणि अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे मुंबई युवा जिल्हा अध्यक्ष मार्शल कोळी यांनी आदित्य ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला.

आपली प्रतिक्रिया द्या