मुंबईत घरगुती गणेश दर्शन स्पर्धा

परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळाचे यंदाचे 25वे रौप्यमहोत्सवी वर्ष असून दरवर्षीप्रमाणे लालबाग-परळमधील स्वर्गीय आमदार विठ्ठल चव्हाण यांच्या स्मरणार्थ लालबाग-परळ-करी रोड (प्रभाग क्र.203 मर्यादित) घरगुती गणेश दर्शन स्पर्धा 2024चे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे संस्थापक आनंद गांवकर व संचालक सुधीर साळवी, रवींद्र कुवेसकर, संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवराज प्रतिष्ठान (परळ) व विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान (परळ) यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धत सहभागी होण्यासाठी नाना फाटक (9224295179), प्रभाकर मोरजकर (9773780401), रवींद्र ओटवकर (9869365242), अमर जाधव (9819068724), सुवर्णा गुराम (9870523733) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेचे आयोजन पराग विठ्ठल चव्हाण, प्रणव सुभाष डामरे, अभिषेक गवाणकर, उर्मिला पांचाळ यांनी केले आहे.