कशेडी घाटात दरड कोसळली, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रात्रभर ठप्प राहणार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात आज रात्री नऊच्या सुमारास दरड कोसळली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात धामणदेवी गावाच्या हद्दीत दरड कोसळली आहे. दरड उपसण्याचे काम सुरू असून महामार्गावरील वाहतूक रात्रभर ठप्प रहाणार आहे.

पोलादपूर पोलिस आणि एल अँड टी चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आज रात्रभर दरड उपसण्याचे काम सुरू राहणार आहे. यादरम्यान, कशेडी घाट वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या