ऍड. अनिल परब यांना बहुमताने निवडून आणणारच! अदानी इलेक्ट्रिसिटी महासंघाचा निर्धार

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांताक्रुझ पूर्व येथील सितासिंधु सभागृहात अदानी इलेक्ट्रिसिटी स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे आस्थापनातील पदवीधर मतदारांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात शिवसेना नेते व मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अॅड. अनिल परब यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.

शिवसेना सचिव, खासदार आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अदानी इलेक्ट्रिसिटी स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष, आमदार विलास पोतनीस यांच्या उपस्थितीत अदानी इलेक्ट्रिसिटी स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस मंगेश दळवी यांनी हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला विधानसभा संघटक सदा परब, विधानसभा संघटिका हर्षदा परब, उपविभागप्रमुख बळीराम घाग, शाखाप्रमुख संतोष गुप्ता, संदीप शिवलकर, शाखा संघटक अंजली जाधव, नंदा शिंदे, वामन कदम, भारत दळवी, महेश कोयंडे, मंगेश कवठणकर, प्रशांत देसाई, प्रमोद परब, उदय परब, पराग शृंगारपुरे, राजेंद्र लकेश्री उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पैलास चव्हाण यांनी केले.